
खडकेवाके |वार्ताहर| Khadkewake
राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे तरुणाने विषारी पदार्थ घेतल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खडकेवाके येथील मंगेश भास्कर पोकळे (वय 27) याने शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता रोगर हा विषारी पदार्थ घेतले.
हे घरच्या माणसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला ताबडतोब प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर सलग चार दिवस उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी पहाटे 5.30 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी दोन वाजता अत्यंत शोकाकूल वातावरणामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.