भिमाशंकरला गेलेल्या खडका येथील युवकांच्या कारला अपघात

एकजण ठार
भिमाशंकरला गेलेल्या खडका येथील युवकांच्या कारला अपघात

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील खडकाफाटा (Khadaka Phata) येथून भिमाशंकरला (Bhimashankar) गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात (Accident) होऊन त्यात 22 वर्षीय युवा हॉटेल व्यावसायिक अमोल लोखंडे हे जागीच ठार (Death) झाले तर इतर चार जण जखमी झाले.

अमोल लोखंडे याच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ, आत्या, चुलते असा परिवार आहे. शुक्रवार दि.16 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे, मनोज शिंदे, नितीन निपुंगे यांच्या समवेत स्विफ्ट कार (एमएच 43 आर 6423) ने भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री 11.30 ते बारा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा ते ओतूर रस्त्यावरील आणे घाटावर पडलेल्या दरडीला ही कार धडकली व पुढे जाऊन उलटली.

यामध्ये अमोल लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील अन्य युवक जखमी झाले. जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले तर अमोल लोखंडे यांचा मृतदेह दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या खडकाफाटा रोडवरील निवासस्थानी आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कारं करण्यात आले.

रमेश लोखंडे यांचा अमोल एकुलता एक मुलगा होता.अमोलच्या निधनाने नेवासा शहर व खडकाफाटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com