खडकाफाटा परिसरातील कंपनीस आग; गुप्तता पाळल्याने उलटसुलट चर्चा

खडकाफाटा परिसरातील कंपनीस आग; गुप्तता पाळल्याने उलटसुलट चर्चा

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Phata) खडकाफाटा (Khadaka Phata) येथील एका कंपनीस (Company) तीन दिवसांपूर्वी आग (Fire) लागल्याची चर्चा असून या आगीबाबत गोपनीयता बाळगली गेल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.

या कंपनीत अवैध मद्यनिर्मितीसाठी केमिकल (Illegal alcohol production Chemical) बनवले जात असल्याची व त्याबाबत सुगावा लागल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी आग (Fire) लावली गेली असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. अग्निशमन बंबाला बोलावून आग विझविण्यात यश आले. मद्यार्क तस्करीचा हा प्रकार नसावा ना? अशी शंका परिसरातील नागरिक चर्चा करताना व्यक्त करताना दिसत आहेत. कारण यापूर्वीही या परिसरातून अशाप्रकारचा उद्योग उघडकीस आला होता. पोलीस (Police) यंत्रणेला कुणकुण लागल्याने ही आग लावली गेली असावी अशीही चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.