खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार

तिघे सराईत गुन्हेगार || विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकूण 24 गुन्हे दाखल
खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (LCB) पोलीस पथकाने मंगळावारी रात्री नेवासा (Newasa) तालुक्यातील खडकाफाटा (Khadakaphata) येथील सिमेंट पोल फॅक्टरीजवळ दरोड्याच्या (Robberies) तयारीत बसलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद (Robbers Gang Arrested) केली. यातील चौघांना अटक (Arrested) करण्यात आली असून दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. अटक केलेल्या आरोपींनी यावर्षी नेवासा (Newasa) तालुक्यात केलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील तिघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी अहमदनगर (Ahmednagar) व संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांअंतर्गत केलेल्या एकूण 24 गुन्ह्यांची नोंद आहे.

याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून खडकाफाटा येथे काहीतरी गंभीर गुन्ह्याच्या हेतूने काही लोक बसलेले असल्याची माहिती समजली. त्यांनी त्याठिकाणी पोलीस पथक रवाना केले.

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार
भंडारदरा 70 टक्के भरले

पोलीस पथक नमूद ठिकाणी आले असता सदर गुन्हेगार (Criminal) पळून जावू लागले. पोलिसांना त्यापैकी चौघांना पकडण्यात यश आले तर दोघे पळून गेले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांचे नाव गाव विचारले. त्यामध्ये किरण बाळु काळे (वय 19) रा.बाळापुर बोलेगांव ता. गंगापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), रामेश्वर जंगल्या भोसले (वय 26) रा. पांडेगव्हाण ता. आष्टी (जि. बीड), अभिक ऊर्फ महाडीक बंड्या भोसले (वय 21) रा. बोलेगांव ता. गंगापूर, स्वरुप ऊर्फ गुंड्या डिचार्ज काळे (वय 24) रा. अंतापूर ता. गंगापूर असे असल्याचे सांगितले.

पळून गेलेल्या इसमाचे नाव अरुण काळे व तीनताश्या खंडु काळे दोघेही रा. बोलेगांव ता. गंगापूर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक तलवार, एक एअरगन व लाकडी दांडके मिळून आले. हत्याराबाबत अधिक विचारपूस करता संशयीत इसमांनी नेवासा (Newasa) परिसरात शेतवस्तीवर जावून कोठेतरी दारोडा घालण्याची तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार
शेतकर्‍याच्या घरातून भरदिवसा 12 तोळे सोने व 6 लाख रुपयांची चोरी

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास करुन त्यांनी आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अगर चोरीचे गुन्हे केली आहे. याबाबत विचारणा करता त्यांनी नेवासा परिसरात 2023 मध्ये केलेल्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून 500 रुपये किंमतीची एक तलवार व लाकडी दांडके, दीड हजार रुपये किमतीची एक एअरगन, 16 हजार 500 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे तीन मोबाईल फोन व दोन लाख रुपये रुपये किंमतीच्या चार शाईन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 18 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवून आरोपी विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 769/2023 भारतीय दंड विधान कलम 399, 402 सह आर्म ऍक़्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींमधील स्वरुप ऊर्फ गुंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, दरोडा तयारी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये वाळूज (ता. गंगापूर) येथे 2020 मधील तीन, गंगापूर येथील 2020 मधील एक, खुलताबाद येथील 2022 मधील एक, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत 2022 मधील एक तर पाथर्डी (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यातील 2020 मधील दोन व 2022 मधील दोन असे विविध पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत.

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार
खबरदार ! कायदा हातात घ्याल तर...

आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले हाही सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द पैठण येथे 2017 मधील एक, गंगापूर येथील 2017 व 2020 मधील प्रत्येकी एक, राहुरी येथी 2018 मधील एक, कर्जतमधील 2021 मधील दोन, सिलेगाव (जि. संभाजीनगर) मधील 2022 मध्ये एक, नगर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत 2022 मधील एक तर पार्डी येथे 2022 मधील दोन गुन्हे असे दहा गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा आरोपी अभिक ऊर्फ महाडीक भोसले याच्यावर गंगापूर येथे 2020 मधील दरोड्याच्या तयारीचा एक गुन्हा दाखल आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार
70 हजार जनावरांना देणार ‘लम्पी’ ची लस
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com