केसापूर बंधार्‍यावरून पडून तरुण बालंबाल बचावला

कठडे नसल्याने बंधारा ठरतोय जीवघेणा
केसापूर बंधार्‍यावरून पडून तरुण बालंबाल बचावला

आंबी |वार्ताहर| Ambi

उक्कलगावमध्ये फुलहार, माळा देऊन केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधार्‍याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गणेश मोहन भगत (रा. केसापूर राहुरी) हे अंदाज न आल्याने तोल जाऊन बंधार्‍यात पडले. दैव बलत्तर म्हणून भगत हे थोडक्यात बचावले.

सदरची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर-उक्कलगाव केटीवेअर बंधार्‍यावर बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी उक्कलगाव येथील बंधार्‍यावर पोहण्यासाठी काही तरुण आले होते. त्यावेळी भगत हे अंदाज न आल्याने बंधार्‍यात पडत असल्याचे तरुणांनी पाहिले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोहणार्‍या युवकांनी बंधार्‍यात उड्या घेतल्या. काही अनर्थ घडण्याच्या आत तरुणांनी भगत यांना तातडीने बाहेर काढले.

राहुरी व श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावर असलेल्या प्रवरानदी वरील केसापूर के.टी. वेअर बंधार्‍याला कठडे नसल्याने अपघात घडत आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांनी या बंधार्‍याला संरक्षक कठडे बसविण्याची वेळीवेळी मागणी केली असताना अद्यापही संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाहीत.

राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा मध्यवर्ती के.टी. वेअर बंधारा आहे. केसापूर, आंबी, दवणगाव, बेलापूर, केशव गोविंद बन देवस्थान, राहुरीकडे जाणार्‍यांसाठी हा जवळाचा रस्ता आहे. या बंधार्‍याचा प्रवासी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक रस्त्याचा वापर करतात. या बंधार्‍यावरून नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत केसापूर बंधार्‍याचा वापर जीवघेणा ठरत आहे.

संबंधित विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा आणखी एखादा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण? असा सवाल प्रवासी वर्ग व पंचक्रोशीतील नागरिकांमधून विचारला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com