केंदळ बु.-उंबरे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ना. तनपुरेंनी अधिकार्‍यांना खडसावले

ग्रामस्थांचा तक्रारीचा पाढा
केंदळ बु.-उंबरे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ना. तनपुरेंनी अधिकार्‍यांना खडसावले

केंदळ |वार्ताहर| Kendal

राहुरी (Rahuri) तालुक्यातील केंदळ बुद्रुक (Kendal Burduk) ते उंबरे (Umbare) सुमारे साडेपाच किलोमीटर डांबरीकरणाचे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे (Road work is of inferior quality) झाले आहे. या कामाचे पितळ येथील ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून चव्हाट्यावर आणल्याने त्याची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. कामाची चौकशी करून रस्त्याचा दर्जा सुधारावा यासाठी संबंधित अधिकार्‍यांची कानउघाडणी करून त्यांना सूचना केल्या. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

सन 2019-20 यामधील मंजूर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण साईडपट्टीवर मुरुमीकरण करण्यासाठी डंपर या रस्त्यावर गेला असता डंपरच्या ओझ्याने हा रस्ता पूर्ण खचून गेला. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष विशाल तारडे, अविनाश यादव, नवनाथ कैतके, रामेश्वर तारडे, सुनील भांड, अच्युत बोरकर, सुधीर भुशे, पोपट तारडे, गणेश तारडे, शरद कैतके, बापू भुशे, सुभाष तारडे, पोपट चव्हाण, जनार्दन तारडे, शैलेश डोंगरे, सोमनाथ भांड, विजय चव्हाण, प्रशांत भुसे यांनी याबाबतीत सोशल मीडियावर रस्त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने त्याची ना. तनपुरे यांनी दखल घेत प्रत्यक्षात पाहणी केली. पंचायत समितीचे शाखा अभियंता वाय. टी. कंगनकर, शिवाजी पानसरे यांना सूचना केल्या. यावेळी रस्त्याच्या दर्जाबाबत संतप्त नागरिकांनी ना. तनपुरेंसमोर तक्रारींचा पाढा वाचला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com