केलवडला वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

पावसात मोबाईलवर बोलताना घडली दुर्घटना
केलवडला वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यातील केलवड येथेे वीज अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. केलवड येथील ताई शिवाजी रजपूत (वय 35) असे या मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला घराजवळील शेतात काम करत होती. यावेळी विजा चमकत होत्या. घरात मोबाईल आला म्हणून या महिलेच्या मुलीने पळत जाऊन तिच्याकडे मोबाईल देवुन घराकडे निघाली.

महिलेने मोबाईल सुरू करताच वीज अंगावर पडली. सोमवारी सायंंकाळी 6.45 पूर्वी तिच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या नातेवाईकांनी तिला राहाता येेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारापूर्वीच ती मयत झाली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून राहाता पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. नरोडे करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार भांगरे, मंडलाधिकारी कुलथे, तलाठी श्रीमती देवकर, पोलीस पाटील सुरेशराव गमे पाटील, सरपंच दीपक कांदळकर, उपसरपंच विशाल वाघे, सदस्य गणेश घोरपडे, शिवाजी गमे, अविनाश गमे, चांगदेव कांदळकर आदी यावेळी उपस्थित होते. महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com