अनोळखी तरूणाचा केडगावात गळा आवळून खुन

ओळख पटविण्यासह खुनी शोधण्याचे पोलिसांसमोर आवाहन
अनोळखी तरूणाचा केडगावात गळा आवळून खुन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव (Kedgav) उपनगरातील देवीकडे जाणार्‍या रस्त्यावर एका अनोळखी तरूणाचा गळा आवळून खुन (Youth Murder) केल्याची घटना काल (गुरूवारी) सकाळी उघडकीस आली. सदर तरूणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल (Murder Filed a Case) करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (PI Chandrashekhar Yadav) यांनी सांगितले.

अनोळखी तरूणाचा केडगावात गळा आवळून खुन
40 हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता; नगरला 110 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्पाचा समावेश

ओंकार ऊर्फ गामा भागानगरे यांचा तलवारीने खुन (Sword Murder) केल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी केडगाव देवी रोडवर एका 33 वर्षीय तरूणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. याची माहिती कोतवाली पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह (Dead Body) ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. सदर तरूणाचा गळा आवळून खुन केल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात येणार असल्याचे निरीक्षक यादव यांनी सांगितले.

दरम्यान, त्या तरूणाची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तो तरूण परप्रांतीय असल्याची शक्यता आहे. एखाद्या हॉटेलमध्ये अथवा चायनीज गाडीवर काम करणारा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अनोळखी तरूणाचा केडगावात गळा आवळून खुन
दिवसा घरफोडून तीन तोळ्याचे दागिने लांबविले

33 वर्षीय तरूणाचा गळा आवळून खुन केल्याची घटना केडगावात घडली. तो अनोळखी असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. बुधवारी (दि. 28) रात्री सदर तरूणासह त्याचे इतर तीन साथीदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीकोनातून तपास सुरू आहे.

- पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

अनोळखी तरूणाचा केडगावात गळा आवळून खुन
पालकमंत्री विखे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com