
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करत गजाने मारहाण केल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात घडली. व्दारका बाबासाहेब कराड (वय 45 रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून राजु पुंड, हिराबाई राजु पुंड, ऋषिकेश राजु पुंड, हिराबाईची बहिण (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी शेळ्या चारून घरासमोर आल्या असता त्यांना चौघांनी विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फिर्यादी त्यांना शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ऋषिकेशने लोखंडी वस्तू व गजाने डोक्यात मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.