केडगावात दोन कुटुंबात दगडफेक, हाणामारी

नारळाच्या झाडावरून वाद; परस्परविरोधी फिर्यादी
केडगावात दोन कुटुंबात दगडफेक, हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेजारी-शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबियांमध्ये नारळाच्या झाडावरून झालेल्या वादात हाणामारी, दगडफेक झाल्याची घटना बुधवारी दुपारी केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी हाणामारी, अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

दोन कुटुंबियांची घरे असलेल्या ठिकाणी नारळाचे झाड आहे. या झाडावरून दोन कुटुंबियांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. बुधवारी दुपारी एका कुटुंबातील महिला नारळाच्या झाडावरील नारळ तोडत असताना शेजारी राहणार्‍या कुटुंबियांतील दोघांनी सदर महिलेस नारळाच्या झाडावरील नारळ का तोडले, असा जाब विचारत जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करत आहेत.

शेजारी राहणार्‍या कुटुंबातील महिलेने दुसरी फिर्याद दिली आहे. नारळाच्या झाडावरून आमचे वादविवाद सुरू असून शेजारी कुटुंबातील महिलेचा पती नेहमी रात्री बेरात्री शिवीगाळ करत असतो. बुधवारी मी व मुलगा घरी असताना झाडाचा आवाज आल्याने मुलगा काय झाले हे बघायला गेला असता शेजारील महिला झाडाचे नारळ तोडत होती. तिने मुलाला व मला शिवीगाळ करत आमच्या दिशेने दगड फेकले. तिच्या पतीने मी घरासमोर असताना माझ्याजवळ येऊन माझा विनयभंग केल्याचे व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.