करोना कहर; भूषणनगर परिसर सील
सार्वमत

करोना कहर; भूषणनगर परिसर सील

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

केडगाव परिसरातील भूषणनगर परिसर महापालिका प्रशासनाने सोमवारी दुपारी सील केला. करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्याने संसर्ग रोखण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली. कंटेन्मेंटची मुदत 2 ऑगस्टपर्यंत आहे.

केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातही भूषणनगर परिसर आणि या परिसराला लागून असलेल्या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा परिसर सील करण्याबाबत महापालिकेत हालचाली सुरू होत्या. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या संदर्भात निर्णय घेऊन सोमवारी दुपारी चारनंतर हा परिसर सील करण्यात आला.

या भागातील भूषणनगर, लिंक रोडवरील तिरुपती कन्स्ट्रक्शन कार्यालय, गणपती मंदिराजवळील परिसर, राणी लक्ष्मीबाई चौक परिसर, वृंदावन पार्क, झेंडा चौक हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून चहूबाजूंनी सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या दक्षिण बाजूस असलेले चर्च, गणपती मंदिर, शिवांजली मंगल कार्यालय, राहिंज मळा व परिसर, राम मंदिर, श्रीकृष्ण कॉलनी, नम्रता रो हाऊसिंग, अजिंक्य रो हाऊसिंग, जिल्हा परिषद शाळा व परिसर, लिंक रोडची पूर्व बाजू, रंगोली हॉटेल, दीपनगर, आयोध्यानगर व परिसर, स्वामी विवेकानंद चौक, माधवनगर परिसर बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशासाठी भूषणनगरमधील राधेश्याम कॉम्प्लेक्स शेजारील रस्ता प्रवेश रस्ता म्हणून ठेवण्यात आला आहे.

कंटेन्मेंट झोनमधील सर्व व्यवहार आता 2 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागात अत्यावश्यक सुविधा महापालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच बफर झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

कण्टेन्मेंट झोन - भूषणनगर, लिंक रोडवरील काही भाग, गणपती मंदिर व राणी लक्ष्मीबाई चौकाजवळील जवळील वसाहत, वृंदावन पार्क, झेंडा चौक आदी. बफर झोन - चर्च व गणपती मंदिर, राहिंज मळा, श्रीकृष्ण कॉलनी, नम्रता रो हाऊसिंग, अजिंक्य रो हाऊसिंग, दीपनगर, आयोध्यानगर, रंगोली हॉटेल, स्वामी विवेकानंद चौक, माधवनगर परिसर.

Deshdoot
www.deshdoot.com