केडगावातून दुचाकी चोरणारा गजाआड

दुचाकी हस्तगत || कोतवाली पोलिसांची कारवाई
केडगावातून दुचाकी चोरणारा गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरातून दुचाकी चोरणार्‍याला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले. आदित्य आत्मराम गंगथडे (रा. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

योगेश ज्ञानदेव राऊत (वय 25 रा. केडगाव) यांची दुचाकी 25 जुलै रोजी दुपारी 11:45 ते 12:45 वाजेच्यादरम्यान चोरीला गेली होती. याप्रकरणी राऊत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, तानाजी पवार यांच्या पथकाने चोरट्याचा शोध घेतला. गंगथडे याने दुचाकी चोरल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला अटक केली. अधिक तपास पोलीस हवालदार बाबासाहेब ईखे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com