केडगाव बायपासवर गोमांस करणारा टेम्पो पकडला

केडगाव बायपासवर गोमांस करणारा टेम्पो पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव बायपास परिसरात गोमांस वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी शनिवारी कारवाई करून पकडला. टेम्पोतील 1000 किलो गोमांस व टेम्पो असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपास परिसरातील शनिकृपा टायर शोरुमसमोर ही कारवाई करण्यात आली. आमीर अहमद रशीद अहमद शेख (वय 44, रा.हनुमान नगर, मुंबई), मोहंमद अख्तर आदिश खान (वय 38, रा. न्यु पत्रा कारी रोड, जमील नगर, भांडुप, मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते दोघेही पिकअप (एमएच 04 एलई 1955) मध्ये गोवंशीय मांस वाहतूक करताना आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com