दुकाने खाली करण्यासाठी चौघांना मारहाण

केडगावातील घटना; सहा जणांविरूध्द गुन्हा
दुकाने खाली करण्यासाठी चौघांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात ताराबाग कॉलनी कॉर्नरजवळ असलेले माठ विक्रीची दोन दुकाने खाली करण्यासाठी सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी चौघांना शिवीगाळ, मारहाण करत एकावर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मनोज रामबाबु शहा (वय 19 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा ते सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, त्यांची आई व दोन मामा त्यांच्या नगर-पुणे रोडवरील ताराबाग कॉलनी कार्नरजवळील दुकानावर असताना त्यांना दोन मोबाईल नंबरवरून फोन आले. त्यांनी दुकाने खाली करण्यास सांगितले. यानंतर सहा ते सात जण दुकानावर आले.

त्यांनी दुकाने खाली करा, असा दम देऊन दुकान खाली न केल्यास व त्यांना भेटण्यास न गेल्याच्या कारणावरून फिर्यादी, त्यांची आई व दोन्ही मामांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे मामा अमर पारस शहा यांच्या हाताच्या दंडावर धारदार हत्याराने मारून दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com