केडगाव दुहेरी हत्याकांड : सुवर्णा काेतकर यांना जामीन

केडगाव दुहेरी हत्याकांड : सुवर्णा काेतकर यांना जामीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर (Former Deputy Mayor Suvarna Kotkar) यांना जिल्हा न्यायालयाने (District Court) केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात (Kedgav Shivsainik Murder Case) अटी-शर्तीसह जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून (Conspiracy of Double Murder of Shiv Sainiks in Kedgaon) त्याची अंमलबजावणी केल्याच्या आराेपात त्या पसार हाेत्या. जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर करताना पासपाेर्ट जमा करणे आणि काेणत्याही परवानगी शिवाय महाराष्ट्र राज्य साेडायचे नाही, असे म्हटले आहे.

महापालिकेच्या पाेटनिवडणुकीनंतर (Municipal By-Elections) केडगावातील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने (Murder Case) राज्यभरात खळबळ उडाली हाेती. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३२ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवला. यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक (Police Arrested) केली. तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला. सुवर्णा कोतकर व दोन आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, अद्यापही त्यांना अटक (Arrested) झालेली नव्हती.

या घटनाक्रमासह गुन्ह्यात दोषारोप ठेवलेल्या आठ जणांसह संदीप कोतकर, सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकरचा हत्याकांडात सहभाग असल्याचे सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे. सुवर्णा काेतकर या माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची मुलगी असून, माजी महापाैर संदीप काेतकर यांची पत्नी आहेत. जिल्हा न्यायालयात सुवर्णा काेतकर यांच्यातर्फे विधीज्ञ महेश तवले, विवेक म्हसे पाटील आणि सागर वाव्हळ यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com