वाहन चालकाचा खून करणारा गजाआड

नगर तालुका पोलिसांची कामगिरी
वाहन चालकाचा खून करणारा गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव-अरणगाव बायपास रोडवरील (Kedgaon-Arangaon Bypass Road) रेल्वे ब्रीजजवळ (Railway Bridge) वाहन चालकाचा खून (Driver Murder) करणार्‍या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक (Nagar Taluka Police Arrested) केली आहे. मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक, नगर, हल्ली रा. अरणगाव ता. नगर) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत (Police Cell) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने (Order by the Court) दिले आहेत.

25 ऑगस्ट रोजी रेल्वे ब्रीजजवळ (Railway Bridge) एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होते. सदर मयताचे शवविच्छेदन केले असता त्याचा मारहाणीत मृत्यू (Beating Death) झाल्याचे समोर आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police) खूनाचा गुन्हा दाखल (Filed a Murder Charge) केला होता. पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे काम काही तासांमध्ये केले. सदर मयत व्यक्ती विकास महादेव कदम (वय 40 रा. वैष्णीवनगर, केडगाव) असल्याचे समोर आले. मयत व्यक्तीच्या मारेकर्‍याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर (Police) होते.

विकास विषयी अधिक माहिती पोलिसांनी (Police) काढली असता तो व मिनीनाथ मित्र असल्याचे समोर आले. त्यांच्यात वाद झाल्याने मिनीनाथने विकासला मारहाण (Beating) केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू (Death) झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील (Ajit Patil, Deputy Superintendent of Nagar Grameen) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस कर्मचारी पठाण, रमेश गांगर्डे, रावसाहेब खेडकर, भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर खिळे, प्रशांत राठोड, जयदत्त बांगर, घोरपडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com