चापडगाव (वार्ताहर) -

शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उर्जित अवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. यंदाच्या

गाळप हंगामात 5 लाख टन ऊस गळपाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू असा विश्वास केदारेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी व्यक्त केला.

केदारेश्वरच्या 1 लाख 11 हजार 111 व्या साखर पोत्याचे पूजन कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. शेवगाव तालुक्याची कामधेनू असलेल्या केदारेश्वर साखर कारखान्यांची उभारणी अतिशय कष्टाने केली असून ऊस तोडणी कामगारांच्या मालकीची असलेली ही संस्था मध्यंतरी आर्थिक अडचणीत सापडली होती. परंतु अशाही परिस्थितीत कारखान्यांची विक्री होऊन न देता कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढला असे ढाकणे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी प्रशासक तथा लोकमंगल साखर कारखान्याचे संस्थापक संचालक अविनाश महागावकर म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मध्यंतरी अडचणीत सापडलेल्या केदारेश्वर साखर कारखान्याची वाटचाल प्रेरणादायी असून राज्यातील साखर उद्योगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याचे संस्थापक ढाकणे व कारखान्यांचे चेअरमन अॅॅड प्रताप ढाकणे यांच्या कुशल मार्गदर्शना खाली केदारेश्वर लवकर कर्ज मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे, मुख्यकार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता सी.डी.फकीर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास ऊस सुभाष जमधाडे, नॅशनल फेडरेशनचे उपमुख्य तांत्रिक सल्लागार बाळकृष्ण गीते, साईकृपाचे संचालक बंटी जगताप, अभिनाथ शिंदे, प्रभावती ढाकणे, केदारेश्वरचे उपाध्यक्ष डॉ. घनवट तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, संचालक सुरेशचंद्र होळकर, भाऊसाहेब मुंढे शेषराव बटुळे, त्रिंबक चेमटे, सतीश गव्हाणे, मोहनराव दहिफळे, राजेंद्र दौंड, परमेश्वर विखे कारखान्यांचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्य लेखापाल तिर्थराज घुंगरट, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, अंबादास दहिफळे आदींसह शेतकरी सभासद कारखान्यांचे कर्मचारी कामगार उपस्थित होते.