‘केदारेश्वर’ची चौकशी करा

सभासदांची केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
‘केदारेश्वर’ची चौकशी करा

शेवगाव |वार्ताहर| Shevgav

तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करून कारखाना उभारणीपासून आजपर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी सभासद शेतकर्‍यांनी केंद्रीय सहकारी खात्याचे मंत्री अमित शाह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कारखाना सुरू झाल्यापासून कारखाना प्रशासनाने सरकारचे नियम न पाळता मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याने तसेच शासनाने ठरवून दिलेल्या पात्रतेच्या अधिकार्‍यांची नेमणूक न करता राजकीय फायद्यासाठी पात्रता नसलेल्या मर्जीतील लोकांकडे कारखान्याचा कारभार सोपवून सभासद व कारखान्याचे आर्थिक नुकसान केले कारखाना उभारणी पासून आजतागायत कायमस्वरूपी कार्यकारी संचालकपद भरलेले नाही तसेच कारखान्याचे महत्त्वाच्या पदावरही कायमस्वरूपी पात्रताधारक व्यक्तीची नियुक्ती न करता नियमबाह्य पद्धतीने मर्जीतील लोकांकडे पदभार सोपविण्यात आलेला आहे.

उसाचे पैसे इतर कारखान्यांपेक्षा कमी देऊन शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या लाचार बनविल्याने केदारेश्वर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करून ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com