अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील कौठवाडी शिवारात लागलेल्या आगीत 25 एकर शिवाराला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

या आगीत विविध झाडे, सरपटणारे प्राणी, चार्याच्या पेंढया यांचे नुकसान झाले.

कौठवाडी येथील काशिनाथ साबळे, शंकर साबळे हे घरी नसताना अचानक सकाळी 11 वाजेच्या 25 एकर शिवाराला आग लागली. त्यात आंबा, काजू, जांभूळ, बदाम, चिकू आदी 100 झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी झाले. दुपारी प्रचंड ऊन व त्यात आग लागल्याने परिसरातील सरपटणारे प्राणी त्या आगीच्या भक्ष्यस्थानी झाले.

तर साबळे यांच्या खळ्यावर असणारे 250 पेंढे जळून खाक झाले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. इंदिरा साबळे यांनी आरडा ओरडा केला तर आग घराकडे सरकू लागल्याने त्यांचा मुलगा व त्या दोघा मायलेक हौदात असलेल्या पाण्याने ती आग विझविण्यासाठी जीवाचा आटापिटा करून घरापर्यंत ती आग येऊ दिली नाही. मात्र मोठे नुकसान या कुटुंबाचे झाले आहे.

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी. गोंदके, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचेकडे तक्रार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचे शंकर साबळे यांनी सांगितले. तर त्यांच्या पत्नी सौ. इंदिरा साबळे म्हणाल्या, माझे पती व सासरे घरी नसताना ही आग लागून मोठे नुकसान झाले खळ्यावर असलेला जनावरांचा पेंढा जळाला.

मी खळ्यावर आग विझविण्यासाठी धावले जनावरे सोडून दिले. त्यामुळे घर वाचले असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. कामगार तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.