कौठा येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

कौठा येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील कौठा येथील दिगंबर घनश्याम राऊत (वय 27) या युवकाचा विहिरीच्या पाण्यात पडून मृत्यू झाला.

कौठा-महालक्ष्मीहिवरा रोड पासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर गट नं. 135 मधील आपल्या शेतात दिगंबर काम करत होता. पण बराच वेळ झाला तो घरी आला नाही. म्हणून वडील घनश्याम राऊत यांनी शोध केला असता त्याच्या घराजवळच असलेल्या विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून काहीजण पाण्यात उतरले. पण पाणी जास्त असल्याने जनरेटरच्या साहाय्याने पाणी उपसले असता त्यांच्या मुलाचा मृतदेह असल्याची खात्री झाली.

राऊत यांनी सदर घटनेची माहिती सोनई पोलिसांना दिली. त्यानुसार सोनई पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास हवालदार श्री. दहिफळे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com