कातळापूर गावात महिलांसह अनेकांचे मोबाईल हॅक

घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो; गावातच भांडणे वाढली
कातळापूर गावात महिलांसह अनेकांचे  मोबाईल हॅक

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कातळापूर गावात 50 पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे मोबाईल हॅक केले असून

मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आल्याने गावातल्या गावातच मेसेज आल्याने तरुणांनी एकमेकाची गच्ची व शिवीगाळ सुरू केली. त्यातच दुसर्‍या गावातूनही काही लोक कातळापूर गावात येऊन त्यांनीही एका तरुणाला चोप दिला. त्यामुळे गावात संतप्त वातावरण झाले.

काल राजूर पोलीस स्टेशन तसेच माजी आमदार वैभवराव पिचड यांना या घटनेचा तपशील दिला व तातडीने या हॅकर्सचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली आहे. अण्णासाहेब खाडगीर, बलवान उघडे, राजू खाडगीर, सचिन गावंडे, भास्कर तातळे, भाऊसाहेब साबळे, दत्तू काठे, श्रावण काठे, वाळू धिंदले, गोरख काठे, भरत काठे, विठ्ठल नाडेकर आदी 35 तरुणांना व काही महिलांना वाईट व घाणेरडे मेसेज पाठवून संबंधित हॅकर त्यांना चॅलेंज करत असून तुम्हाला कुठे जायचे तिथे जा माझे कुणीच वाकडे करू शकत नाही. माझे ज्ञान मला वाचवू शकते असा मेसेज 70388845519, 9595058672, 7517598993 या क्रमांकावरून येतात असे स्थानिकांनी सांगितले. इंटरनेट स्वस्त झाल्याने आता हॅकर्सनी आपला मोर्चा कम्प्युटरऐवजी मोबाईल वापरकर्त्यांकडे वळवला आहे.

मोबाईलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाईलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे. कातळापूर गावात हा हॅकर कोण आहे याचा शोध सुरू असून राजूर पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. सायबर क्राईमला सदर तक्रार पाठविण्यात आली आहे. मात्र तरुण संतप्त झाले असून त्यांना शांततेचे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले आहे.

मोबाईल कसे हॅक होतात ?

हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्रे मिळवू शकतात. जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाईल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर सहज जोडता येते. त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. मोबाईल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट लिंक (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो.अलीकडे इंटरनेट सर्फिंग मोबाईलवरून करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. स्वस्त इंटरनेटमुळे मोबाईलवर इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा कम्प्युटरऐवजी मोबाईल वापरकर्त्यांकडे वळवला आहे. मोबाईलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाईलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com