काष्टीच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांनी दिले राजीनामे

बहूमत असतानाही आ. पाचपुते गटाचा उपसरपंच न झाल्याने नाराजी
काष्टीच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांनी दिले राजीनामे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी सोसायटी असलेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाचपुते यांच्या गटाचे दहा सदस्य असे बहुमत असतानाही उपसरपंच मात्र विरोधी साजन पाचपुते गटाचा झाला. यामुळे नाराज झालेल्या दहाही सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

काष्टी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आमदार पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आमदारांच्या विरोधात जाऊन सरपंच पदाची निवडणूक लढवली. आमदार पुत्रांचा पराभव करत त्यांनी सरपंचपद हस्तगत केले. असे असले तरी काष्टी ग्रामपंचायतीत आ. पाचपुते यांच्या गटाचे 10 सदस्य निवडून आले होते. यामुळे उपसरपंच निवडणुकीत बहूमत असल्याने उपरपंच आ. पाचपुते गटाचाच होणार असा ठाम विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत होता.

मात्र साजन पाचपुते यांनी सात सदस्य असतानाही काही सदस्य फोडून बहुमत मिळवत उपसरपंच पदही आपल्या गटाला मिळवत आ. पाचपुते यांना धक्का दिला. या घडामोडीत मोठी मानहानी झाल्याने आमदार पाचपुते यांच्या गटाचे सर्व दहा सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच साजन पाचपुते यांच्याकडे दिले आहेत.

साजन पाचपुते म्हणाले, या सदस्यांनी राजीनामे देण्याची घाई केली. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ. मात्र आ.पाचपुते गटाचे सदस्य फुटला असल्याने त्यानी त्याला शोधावे. आमच्या गटातील एक जण फुटला असता तर आम्ही एकासाठी सगळ्याचा बळी देत राजीनामे दिले नसते. आम्हाला वाटत नव्हते आमचा उपसरपंच होईल पण ऐनवेळी मदत झाली. नेत्यापेक्षा मतदार जनता महत्वाचे असून राजीनामे देताना जनतेला विचारले पाहिजे होते.

आता राजीनामे देऊन कााहीजन पुन्हा फोन करत असून राजीनामे स्वीकारु नये म्हणून सांगत आहेत. काही राजकीय घडामोडीत दादांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही बाकीचे काही जण हे करायला लावत आहेत. आमदार पाचपुते यांना संपवण्यासाठी काही जण काम करत आहेत. मी जनतेतुन निवडून आलेलो सरपंच आहे . ज्या दहा सदस्याना राजीनामे दयायचे होते त्यांनी मी सरपंच निवडुन आलो त्याच दिवशी दयायचे. होते असे सरपंच साजन पाचपुते म्हणाले.

आपण लवकरच या राजीनामे स्वीकारण्या बाबतीत सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मीटिंग घेऊन निर्णय घेणार आहोत. जनतेने निवडून दिलेले असताना जनतेच्या मताचा अनादर करत केवळ एक सदस्य फुटला म्हणून इतरांनी राजीनामे दिले. मात्र त्यातील अनेक जण राजीनामे स्वीकारू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. यामुळे पेच आहे.

- साजन पाचपुते, सरपंच काष्टी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com