काष्टी येथे चारचाकीतून दोन लाखांची रोकड लंपास

काष्टी येथे चारचाकीतून दोन लाखांची रोकड लंपास

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

चारचाकी गाडीत ड्रायव्हर सीटवर ठेवलेली 2 लाख 31 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी भरदिवसा लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे मंगळवारी (दि.15) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

सदर चोरीबाबत विजय नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय चौधरी हे साई टायर्स यांना ट्रकच्या टायरचे पैसे देण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये रोख रक्कम एका पांढर्‍या कापडी पिशवीत ठेवून त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते.

काष्टी शिवारात नगर दौंड रस्त्यावर हॉटेल जयश्री जवळ त्यांच्या मारुती सुझुकी सियाज गाडी (क्र. एमएच 12, एलव्ही 9270 ) मधून ड्रायव्हर सीटच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडून त्या सीटवर सदर रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पिशवीसह रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com