काष्टी परिसरात दुध भेसळीवर एफडीएचे छापे

दोघांवर गुन्हे, मोठ्या रॅकेटची शक्यता
दुध
दुध

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

अन्न व औषध प्रशासनाच्या पथाकाने छापे टाकत काष्टी परिसरात कृत्रीम दुध तयार करून गायीच्या दूधात भेसळ करणार्या दोघांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एकुण 460 लिटर दुध, 21 किलो पॅरामेट पावडर व 35 लिटर पेराफाईन द्रव रसायण जप्त करण्यात आले आहे.

बाळासाहेब बाबुराव पाचपुते (रा. संतवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा) व संदिप मखरे (रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितोची नावे आहेत. या छाप्यामुळे काही वर्षापुर्वी श्रीगोंदा दुध भेसळ प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकाने बाळासाहेब बाबुराव पाचपुते यांचे राहते घरी पंंचासमक्ष छापा टाकला.

याठिकाणी 25 किलो क्षमतेच्या बॅगांमध्ये 21 किलो पॅरामेट पावडरचा साठा व 40 लिटर क्षमतेच्या एक प्लास्टिक पिंपामध्ये 35 लिटर पेराफाईन द्रव रसायणाचा साठा आढळला. तपासणी दरम्यान त्यांच्या घराबाहेर महिंद्र पिकअप (एम. एच. 16 ए.वाय. 1434) या वाहनामध्ये 40 लिटर क्षमतेचे 15 प्लास्टिक कॅन दुधाने भरलेले आढळून आले. यात भेसळ असल्याचे आढळून आले. हे सर्व रासाण संदीप मखरे हा त्यांना घरपोच आणुत देत असल्याचे त्यांनी सांगीतले.

या दोघांवर अन्न कायदा मानके 38 नुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान संशयित मखरे इतर कोणाला हे रसायण विकत होता. व यामध्ये काही रॅकेट आहे का याचा शोध अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेत आहेत.

कृत्रीम दुधाची निर्मिती

संशयित पाचपुते हा पॅरामेट पावडर व पेराफाईन या रसायंनाचा वापर करून गाईच्या दुधाप्रमाणे दिसणारे कृत्रीम दुध तयार करत होता. हे कृत्रिम दुध गाईंच्या दुधात मिसळून ते दुध डेअरीला घालून सर्वाच्या डोळ्यात धुळ फेकत होता. या कृत्यातून तो अनेकांच्या जीवाशी खेळत असल्याचे अधिकार्यांनी सांगीतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com