काष्टी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

काष्टी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

काष्टी |वार्ताहर| Kashti

काष्टी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काष्टी बाजार हा नगर व पुणे जिल्ह्यातील जनावरांचा सर्वात मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी तसेच खरेदी करण्यासाठी येणारे व्यावसायिक यांची संख्या मोठी आहे.

यासह असंख्य नागरिक, व्यापारी विक्रेते येत असतात. भाजीपाला खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची गर्दी मोठी असते. एकंदर या बाजारात होणार्‍या गर्दीचा भुरटे चोर गैरफायदा घेत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केले जात आहेत. प्रत्येक बाजारात चार ते पाच मोबाईल चोरीला गेल्याची बोंब नागरिक करत आहेत. परंतु पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने त्यांचे फावते आहे. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा कार्यकर्ते अजय रंधवे व परिसरातील नागरीकांंनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com