कासारवाडी शिवारात विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

कासारवाडी शिवारात विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 35 वर्षीय युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री तालुक्यातील कासारवाडी परिसरातील एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप पोपट कोल्हे असे या मयत युवकाचे नाव आहे.

प्रदीप कोल्हे हा दोन दिवसांपूर्वी दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता. तो घरी आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. तो मिळून आला नाही म्हणून शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. सोमवारी रात्री संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. बाबासाहेब पांडे (रा. घुलेवाडी) यांनी शहर पोलिसांना याबाबतची खबर दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कासारवाडी येथे गेले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी या युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पंचनामा करून त्याचा मृतदेह कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर काल दुपारी कोल्हेवाडी येथे प्रदीप कोल्हे याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले करत आहेत. प्रदीप यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याने आत्महत्या केली की त्याचा कुणी घातपात केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.