कासारे शिवारात अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

कासारे शिवारात अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील कासारे ( जांभूळवाडी ) शिवारात रस्ता अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. सागर निवृत्ती जगताप ( वय २५, रा. भागवतवाडी, तळेगाव दिघे ) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कासारे शिवारात ही अपघाताची घटना घडली.

तळेगाव दिघे येथील सागर निवृत्ती जगताप हा युवक दुचाकीवरून लोहारे येथे प्रवास करीत होता. दरम्यान लोहारे शिवारात रस्ता अपघातात डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला असावा, असा अंदाज आहे, मात्र नक्की कशामुळे अपघात झाला, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.

याबाबत स्थानिक रहिवाशांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी व पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे. सदर घटनेने तळेगाव दिघे येथे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com