कासारे शिवारात अपघातात एक ठार

कासारे शिवारात अपघातात एक ठार

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात मालवाहू टँकर व छोटा हत्ती टेम्पोची भीषण धडक होत अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. शिवाजी शहाजी वर्पे (वय 45 वर्ष, रा. पिंपळगाव खोंडी ता. राहाता) असे मयताचे नाव आहे. तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर मंगळवारी (दि. 12) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक एमएच 17 बीवाय 6393) जात असताना समोरून आलेल्या व तळेगाव दिघेच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू टँकरची (क्रमांक एमएच 44 यु 3195) समोरासमोर धडक होत अपघात झाला. अपघातात जबर मार लागल्याने शिवाजी शहाजी वर्पे (वय 45, रा. पिंपळगाव खोंडी ता. राहाता) हे जागीच ठार झाले. अपघातात आणखी कुणी जखमी झाले का याचा तपशील मिळू शकला नाही.

या घटने बाबत वसंत भाऊसाहेब हासे (रा. समनापुर) यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत. अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com