कोपरगावमध्ये करोनाचा कहर सुरूच !
सार्वमत

कोपरगावमध्ये करोनाचा कहर सुरूच !

एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरासह तालुक्यात आज सलग नवव्या दिवशी देखील कोरोनाचा कहर कायम असून कोपरगाव शहर व तालुक्यात काल सापडलेल्या 21 रुग्णांच्या संपर्कातील 175 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 30 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर 145 अहवाल निगेटिव्ह आले तर एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

पोहेगांवात आणखी सहा करोना बाधित

सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील काल पाठवलेल्या 50 रुग्णांच्या स्त्रावा पैकी 6 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पोहेगांव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे यांनी दिली आहे.

पोहेगाव येथील एकुन रुग्ण संख्या 10 झाली आहे. यामुळे पोहेगावकरांची चिंता वाढली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com