बेळगाव, कर्नाटकच्या बसवराज नायकला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले

बेळगाव, कर्नाटकच्या बसवराज नायकला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ओळख लपवून घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरत असतांना बेळगाव, कर्नाटकच्या बसवराज नायकला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नायगाव येथील संत जनार्दन कुट्टी येथे आरोपी बसवराज रामाप्पा नायक,(वय 31) राहणार-रडा रेड्डी, तालुका -अथणी, जिल्हा-बेळगाव, राज्य -कर्नाटक व भाऊराव सहकारी मोरे (वय-30), रा. शिरसगाव, तालुका वैजापूर, जिल्हा-औरंगाबाद यांना ओळख लपवुन चोरी घरफोडीचे साहित्य गुन्हा करण्यासाठी बाळगले व एक लोखंडी गजासह संशयास्पद रित्या मिळून आले.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सतिश गोरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 95/2021 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सतिश गोरे हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com