कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने सभासदांच्या विश्वासावर सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कोपरगाव तालुक्याची कामधेनू असणार्‍या कर्मवीर काळे कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 20 जून 2022 पासून सुरू झाला. 109 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्यावर सोपविला होता. दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी पैकी 88 उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत मागे घेतल्यामुळे एकूण 21 जागांसाठी 21 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

सर्वसाधारण माहेगाव देशमुख गट- अशोकराव शंकरराव काळे, आ. आशुतोष अशोकराव काळे, सूर्यभान बबनराव कोळपे, मंजूर गट- सचिन दिलीप चांदगुडे, श्रीराम बळवंत राजेभोसले, अशोक कोंडाजी मवाळ, पोहेगाव गट- राहुल रमेश रोहमारे, प्रवीण जगन्नाथ शिंदे, राजेंद्र भागवत घुमरे, चांदेकसारे गट- सुधाकर कोंडाजी रोहोम, दिलीप आनंदराव बोरनारे, शंकरराव गहीनाजी चव्हाण, धामोरी गट - अनिल बाळासाहेब कदम, सुनील शिवाजी मांजरे, मनोज पुंडलिक जगझाप (माळी), उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था - वसंतराव कचेश्वर आभाळे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिनिधी- मच्छिंद्रनाथ रंगनाथ बर्डे, महिला राखीव प्रतिनिधी - वत्सलाबाई सुरेश जाधव, इंदुबाई विष्णू शिंदे, इतर मागास वर्ग प्रतिनिधी -दिनार पद्माकांत कुदळे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग - शिवाजीराव माधव घुले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

कर्मवीर काळे कारखाना सभासदांची व शेतकर्‍यांची कामधेनू आहे. कारखाना निवडणुकीत प्रत्येक पात्र सभासदास निवडणूक लढविण्याचा अधिकार लोकशाहीने बहाल केलेला आहे. त्यामुळे पार पडलेली निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने पार पडली. कारखाना सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून सभासद हिताच्या निर्णयामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 88 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध पार पाडली. त्यामुळे नक्कीच कारखान्याचे हित साधले जाणार आहे. भविष्यात देखील माजी खा. कर्मवीर स्व. शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद हिताच्या निर्णयांना नूतन संचालक मंडळ प्राधान्य देईल.

- ना. आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com