साखर निर्यातीचा निर्णय केंद्राने वेळेत घ्यावा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
साखर निर्यातीचा निर्णय केंद्राने वेळेत घ्यावा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दुष्काळ (Drought) व वातावरणातील बदलामुळे (Climate change) यंदा ब्राझीलमध्ये (Brazil) साखरेचे उत्पन्न कमी (Decreased sugar yield) होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या दरामध्ये (Sugar Prices) वाढ झाल्याचे दिसत असून चालू हंगामात 40 ते 50 लाख टन साखर तुटवडा (Lack of sugar) जाणवणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. थायलंड देशामध्ये देखील साखरेचे उत्पन्न (Sugar yield) दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. मागील अडीच वर्षापासून साखरेचे किमान विक्री ( Minimum Sale of Sugar) मूल्य प्रतिकिलो 31 रुपये असून ते किमान 34 ते 35 रुपये प्रतिकिलो वाढविण्याची गरज आहे. येत्या हंगामात देशामध्ये 310 लाख मे.टन साखरेचे उत्पन्न (Sugar yield) होईल असा अंदाज असून पुढील हंगामातील 70 लाख मे.टन साखर निर्यातीचा निर्णय (Sugar export decision) केंद्र शासनाने वेळेत घ्यावा अशी अपेक्षा असल्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांच्या वतीने सांगितले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची (Karmaveer Shankarrao Kale Cooperative Sugar Factories) 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) माजी आमदार अशोकराव काळे (Former MLA Ashokrao Kale) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, कारखान्याचे सर्व पदाधिकारी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते. प्रकृती अस्वस्थामुळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे उपस्थित राहू शकले नाही. आ. काळे यांच्या वतीने जनरल मॅनेजर सुनील कोल्हे म्हणाले, भारतीय साखरेस मागणी वाढणार असल्यामुळे 2021-22 चा गाळप हंगाम आशादायी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर (Sugar prices in the international market) 2 हजार 400 वरून 3 हजार 200 पर्यंत गेले आहे. साखरेच्या दरामध्ये स्थिरता निर्माण झाल्यास बाजाराची परिस्थिती पाहून पुढील हंगामातील साखर निर्यातीचा निर्णय योग्य वेळी घेणार आहे. 2020-21 च्या गळीत हंगामात राज्यात 95 सहकारी व 95 खाजगी असे एकूण 190 साखर कारखान्यांनी घेतलेल्या गाळप हंगामात राज्यामध्ये 1014.30 लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन 106.66 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. राज्याचा साखर उतारा 10.52 टक्के इतका होता. कारखान्याने 2020-21 च्या हंगामात 6,88,784 मे.टन ऊसाचे गाळप करून 7,29,800 क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा 10.60 टक्के मिळाला असल्याचे सांगितले. कारखान्याने सन 2020-21 हंगामाची एफ.आर.पी. प्रति मे.टन रुपये 2 हजार 355 असताना प्रति मे.टन 2 हजार 500 रूपये प्रमाणे ऊस दर दिला आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे (Karmaveer Shankarraoji Kale) व माजी आमदार अशोकराव काळे (Former MLA Ashokrao Kale) यांनी नेहमीच शेतकरी हिताची जपवणूक करण्याची निर्णय घेतले आहे. तीच परंपरा यापुढे देखील सुरु राहणार आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोग तसेच कृषी (Agriculture) व मूल्य आयोगाने ऊसाची एफ.आर.पी. (FRP) रक्कम हि हफ्ते पाडून देण्याची शिफारस केली असली तरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे. केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण मंत्रालयाने ऊसाचे एफ.आर.पी. मध्ये रुपये 50 ची वाढ करून 10 टक्के रिकव्हरी करिता 2 हजार 900 रुपये प्रति मे.टन इतकी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

सभेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी विषय पत्रिकेवरील 1 ते 13 विषय मंजूर करण्यात आले. सर्व संचालक मंडळ व ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी केले तर आभार संचालक अरुण चंद्रे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com