कामगारांना 12 टक्के प्रत्यक्षात वेतनवाढ अदा करणारा कर्मवीर काळे कारखाना राज्यात पहिला

कामगारांना 12 टक्के प्रत्यक्षात वेतनवाढ अदा करणारा कर्मवीर काळे कारखाना राज्यात पहिला

कोळपेवाडी |वार्ताहर| Kolpewadi

महाराष्ट्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली. त्यानुसार कामगारांना 12 टक्के वेतनवाढ ऑक्टोबर 2021 पासून लागू करून प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात देखील जमा केली आहे. त्यामुळे कामगारांना 12 टक्के वेतनवाढ प्रत्यक्षात देणारा काळे कारखाना राज्यात पहिला ठरला आहे.

याबाबत कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या पदाधिकार्‍यांनी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ. अशोकराव काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ, कामगार प्रतिनिधी अरुण पानगव्हाणे, सचिव प्रकाश आवारे, खजिनदार संजय वारुळे व कायदेशीर सल्लागार वीरेंद्र जाधव उपस्थित होते.

कामगार वेतन वाढीबाबत आ. आशुतोष काळे आग्रही होते. त्रिपक्षीय समिती कराराची मुदत संपून बरेच दिवस झाले असताना त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे त्रिपक्षीय समितीचा 12 टक्के वेतनवाढीचा निर्णय होताच त्या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी केली. त्याचबरोबर ऑक्टोबर 2021 पासून कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देऊन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कामगारांना वेतनवाढ लागू करण्यासंदर्भात राज्यात सर्वप्रथम निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे.

कर्मवीर काळे कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना माजी आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर कारभार सुरू आहे. जबाबदारी सांभाळत असताना ऊस उत्पादक शेतकरी व कामगार तसेच कारखान्याशी संबंधित घटकांबाबत आजवर ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत त्या-त्या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली असून तीच परंपरा कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देऊन पुढे सुरू ठेवली आहे. शेतकर्‍यांना देखील एकरकमी 2500 दर दिला असून शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे व कामगारांच्या फरकाची रक्कम देखील लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आहे.

- आ.आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com