कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार

कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत (Pune-Nashik Highway) उपरस्त्यावर ट्रॅक्टर उलटून (Tractor Accident) एकजण जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या (Sangamner) पठारभागातील कर्जुले पठार (Karjule Pathar) येथे घडली. योगेश विलास बर्डे (वय 22, रा. नायगाव थेऊर, पुणे) असे अपघातात मृत्यू (Accident) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार
श्रीरामपुरातून पाच गावठी कट्टे पकडले

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बर्डे हा कर्जुले पठार (Karjule Pathar) येथील नातेवाईकांकडे आलेला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिकच्या (Nashik) दिशेने ट्रॅक्टर घेऊन वरूडी फाट्याकडे जात असताना त्याने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॅक्टर दोन वेळा पलटी झाला. या अपघातात बर्डे हा ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार
वांबोरीच्या डोंगरगण घाटाची ना.तनपुरेंकडून पाहणी

अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यास बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून संगमनेरला (Sangamner) हलविले. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, मनेष शिंदे, योगीराज सोनवणे, उमेश गव्हाणे, नंदू बर्डे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीला पाचारण करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला.

कर्जुलेपठार शिवारात ट्रॅक्टर उलटून एक ठार
हाती आलेल्या नोंदी करणार भांडाफोड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com