दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत- राशीन महामार्गावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून कर्जत येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात भालचंद्र मल्हारी बेलेकर (वय ४०, रा. नेटकेवाडी) व करमाळा येथील प्रवीण संदेश टेंबरे (वय २२) हे गंभीर जखमी झाले आहेत. बेलेकर यांच्या डोक्याला जबर मार लागला असून टेंबरे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com