कर्जतच्या प्रलंबित तुकाई उपसा सिंचन योजनेचा पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

वन्यजीव विभागाची परवानगी मिळाल्याने कामास सुरूवात
कर्जतच्या प्रलंबित तुकाई उपसा सिंचन योजनेचा पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या तुकाई उपसा सिंचन योजनेचे 40 टक्के काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. अखेर महसूल व वन विभाग उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून सदरील कामाला मान्यता मिळाल्याने ही योजना पुर्णत्वाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

तालुक्यातील मौजे बिटकेवाडी येथे जमिनी अंतर्गत पाण्याची पाईपलाईन वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वनविभागाच्या परवानगी अभावी ही योजना 40 टक्के काम पूर्ण झाले असतानासुध्दा परवानगी मिळाली नसल्याने प्रलंबित होती.

तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत 23 पाझर तलाव पुनर्भरण व सिंचन वापरासाठी प्रस्तावित होते. या योजनेत तत्कालीन भाजप शासन काळात गायकरवाडी, खंडाळवाडी, वाघनळी, पाटेगाव खालील चांदे बुद्रुक या चार तलावांचा योजनेत समावेश न झाल्यामुळे पुनर्भरण व वापरास परवानगी मिळालेली नव्हती व तूकाई उपसा सिंचन राखीव वनातील काही क्षेत्रे संपादित होणे असल्यामुळे वनविभागाची संमती देखील प्राप्त होणे आवश्यक होते.

आ.रोहित पवार यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांशी वेळोवेळी बैठका घेऊन तसेच समक्ष पाहणी करून व वन मंत्री सुधीर मुनगंटीवारयांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यानंतर अखेर 11 जानेवारी 2023 रोजी महसूल व वन विभाग उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून सदरील कामाला मान्यता मिळाली असून मंगळवारी त्याच्या प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प व 24 पाझर तलाव कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे भरून देण्याचे प्रयोजन असल्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

विविध विभागांची परवानगी न घेतल्यामुळे ही योजना पूर्वी रखडली होती. याबाबत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. कुठलाही प्रकल्प राजकीय द्वेशातून थांबू नयेे. उलट सत्ता असताना अधिकची आर्थिक ताकद विविध योजनांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिली आहे. परंतु आताचे द्वेषाचे राजकारण बघितल्यानंतर मनापासून खंत वाटते.

- आमदार रोहित पवार

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com