कर्जत (तालुका प्रतिनिधी) -

24 फेब्रुवारी रोजी मिरजगाव येथील आठवडे बाजारात मिरजगावचे अकील मेहबूब शेख (वय 50) हे बाजार करण्यासाठी

जात होते. त्यावेळी 4 अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 5000 रुपये किमतीचा मोबाईल, 1000 रुपये रोख रक्कम व पाकीट बळजबरीने चोरून नेले. तांबोळी यांनी 25 फेब्रुवारीला कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक दहिफळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रबोध हंचे, पोलीस कर्मचारी काळाने, वाघ, सरोदे यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपी कामेश पवार हा मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच इतर साथीदारांची नावे व वास्तव्याबाबत माहिती दिली. त्यावरून तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस नाईक यमगर, सुनील खैरे, जाधव यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. कामेश पवार, (रा. आष्टा, जि. सांगली), नाईक टिळक भोसले, (रा. थेरगाव, हमशेख दिलीप काळे, (वय 20, रा. थेरगाव) हे आरोपी अटक केले आहेत.