कर्जत येथे शिक्षकाची आत्महत्या

कर्जत येथे शिक्षकाची आत्महत्या

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहरातील शहाजीनगर येथे राहणार्‍या शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि. 31) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. नितीन बापूराव होळकर (45) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळकर हे कर्जत येथे आई व दोन लहान मुलांच्या समवेत राहत होते.

काही महिन्यांपासून त्यांची पत्नी त्यांच्या समवेत राहत नसल्याची माहिती मिळत आहे. राहत्या घराच्या किचनमध्ये गुरुवारी पहाटेच्या वेळी साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. कुटुंबियांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगीतले. होळकर यांची भावजय रुपाली सचिन होळकर यांनी कर्जत पोलिसांना फिर्याद दिली. या प्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल उद्धव दिंडे हे अधिक तपास करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com