कर्जत उपजिल्हा रूग्णालय व कोव्हिड सेंटर परीसरात श्रमदान

स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत कर्जतचा प्रथम क्रमांक यावा ही माझी इच्छा : खा. डॉ. विखे पाटील
कर्जत उपजिल्हा रूग्णालय व कोव्हिड सेंटर परीसरात श्रमदान

कर्जत |वार्ताहर| Karjat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी स्वच्छ भारत आभियान सुरू केले आहे.

त्यांच्या या उपक्रमात मी खासदार असलेल्या कर्जत नगरपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवावा, असे माझे स्वप्न आहे आणि यासाठी मी सर्व मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला असून भाजपचा सेवा सप्ताह सुरू आहे. याच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथिल उपजिल्हा रुग्णालय व कोव्हिड रुग्ण असलेल्या परीसरात श्रमदान करून स्वच्छता आभियान राबविण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड गटविकास आधिकारी अमोल जाधव,उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय आधिकारी डॉ.सुचेता यादव,मुख्याधिकारी गोंविद जाधव यांच्यासह नगरसेविका आणि भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या

यावेळी डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, कर्जत नगरपंचायत मागील अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागामध्ये स्वच्छता आभियान राबवत आहे. यामध्ये सामाजीक संस्था आणि नागरिक व खासकरून महिला यामध्ये सहभागी होत आहेत ही बाब चांगली आहे.

माझे वडील ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनीधीत्व करतात तिथे असलेल्या शिर्डी नगरपालिकेने आणि लोणी ग्रामपंचायतीने प्रथम आणि व्दितीय क्रमांक मिळवला आहे यामुळे आता माझी इच्छा आहे.

कि मी खासदार असलेल्या कर्जत नगरपंचायतीने आता प्रथम कमांक मिळवावा आणि यासाठी मी सर्व मदत करण्यास तयार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ आणि सुंदर भारत ही संकल्पना सर्व जण मिळून पूर्ण करूया असेही श्री .विखे म्हणाले

यावेळी नगरंपचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत नगरपंचायत ही 5 ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्पर्धेत उतरली आहे. यामध्ये 185 नगर पंचायती आहेत.

कर्जत शहर हे तसे एरवी पण स्वच्छ असते फक्त आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे तसेच ही आता लोक चळवळ उभी करावयाची आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com