कर्जतला वखारीत लपवले 90 हजाराचे चंदन

पोलीस उपअधीक्षक जाधव यांची कारवाई
कर्जतला वखारीत लपवले 90 हजाराचे चंदन
File Photo

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तस्करी (Smuggling) करून तसेच चोरून पळवलेले चंदन (Sandalwood) कर्जत शहरातील लाकडाच्या वखारीत मध्ये लपवल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीसांनी (Police) शुक्रवारी (दि.24) रात्री छापा (Raid) टाकून 90 हजार रूपये किंमतीचे 22 किलो चंदनाच्या लाकडाचा साठा जप्त (Stocks of sandalwood seized) केला आहे.

शेख मोईनुउदीन (रा. आंबेडकर गेटच्या समोर, कर्जत शहर) असे या प्रकरणी गुन्हा दाखल (Filed a crime) केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका लाकडाच्या वखारीत चंदनाचा साठा (Stock of sandalwood) केल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवून छापा (Raid) टाकला संशयित शेखच्या घरात पहिल्या मजल्यावर चंदनाच्या लपवलेला लाकडाचा साठा (Stock of sandalwood) पोलीसांनी जप्त केला.

एकुण 90 हजार रुपये किमतीची सुमारे अंदाजे 22 किलो वजनाचे चंदन (sandalwood) यात आढळून आले. या नंतर शेख मोहिनुद्दीन याच्यावर कारवाईसाठी वनविभाग कर्जत यांचेकडे मुद्देमालासह ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष गावित ,पोलीस नाईक केशव ह्वरकटे, सागर जंगम घोडके यांनी केली.

Related Stories

No stories found.