कर्जतमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, तीन दुकाने फोडली

कर्जतमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, तीन दुकाने फोडली

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहरामध्ये सोमवारी (दि.28) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत भर वस्तीमध्ये असणार्‍या कर्जत बस स्थानक परिसरातील तीन दुकाने फोडली आहेत. यात सुमारे 41 हजार रुपयांची रोकड पळवून नेली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत व स्थानक परिसरामध्ये मेन रोडवर असणारे गणेश जेवरे यांचे विवेकानंद पुस्तकालय या दुकानाच्या पाठीमागील बाजूने येऊन छताच्या पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला व दुकानातील गल्ल्यातून सुमारे 13 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच असणार्‍या निखिल लोखंडे यांच्या मानसी मेडिकल या दुकानाकडे वळवला.

या दुकानच्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. व दुकानातील आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. शेजारील गिरधारी सिंह राजपुरोहित यांच्या राजश्री स्वीट्स या दुकानाचाही छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला व सुमारे वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. जेवरे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सकाळीच चोरीची माहिती मिळतात शहरातील अनेक व्यापारी विविध संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे प्रमुख हे सर्व आले व त्यांनी पाहणी करून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिबीशन खोसे, मेडिकल संघटनेचे प्रमुख सुरेश तोरडमल आणि सर्व व्यापार्‍यांनी याबाबत तात्काळ पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावला पाहिजे अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच परीक्षा विधी डीवायएसपी अरुण पाटील हे तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी सर्व परिसराची पाहणी केली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. पोलिसांनी पाहणी करून पंचनामे केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com