दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी केले जेरबंद

दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी केले जेरबंद

कर्जत |वार्ताहर| Karjat

दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कर्जत पोलिसांनी आज जेरबंद केले. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात काही संशयास्पद वावरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवले. त्यावेळी त्या ठिकाणी असणार्‍या अट्टल दरोडेखोरांना संशय आला. पोलिसांना पाहताच क्षणी त्यांनी तिथुन पळ काढायला सुरवात केली.

परंतु पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करून जुने शाहूराज बाबासाहेब कोकरे याला त्याच्या पल्सर दुचाकीसह पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी त्याच्या सोबत असणारे शहादेव उर्फ शहाजी गोकुळ शिरगिरे (रा. जामवाडी ता. जामखेड) व अक्षय प्रभाकर डाडर (रा. पाटेगाव ता. कर्जत) हे दोन आरोपी मात्र फरार झाले आहेत.

या सर्वांवर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीला पकडण्यापूर्वी त्यांनी नगर-सोलापूर महामार्गावर एक वाहन आडवले होते. अटक केलेल्या दोघांवर कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाने ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस जवान वैभव सुपेकर, महादेव कोहक, श्याम जाधव, सुनील खैरे यांनी ही कामगिरी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com