अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; मुद्देमाल जप्त

गुन्हे दाखल
अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; मुद्देमाल जप्त

कर्जत | प्रतिनिधी | Karjat

तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होते. त्याची माहिती घेऊन पोलिसांकडून या अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

अवैध दारू विक्री करत असल्याप्रकरणी शकुंतला राजैया गोनीवार, कर्जत, बबन भीमराव तागडकर, मिरजगाव, शैलेश अनिल गोरले, राशीन या तिघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ११५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या दोन ठिकाणी कर्जत पोलिसांनी कारवाई केली. त्यात राजेंद्र माणिक होलम, दस्तगीर इस्माईल सय्यद, रामदास कोंडीबा होलम, शरद दत्तात्रय पवार, भीमराव दत्तू चव्हाण, सर्व रा. भांबोरा व मधुकर यशवंत लोंढे रा. अळसुंदे यांच्यावर अवैधरित्या जुगार खेळत व खेळवीत असल्यामुळे कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील एकूण ४९५१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख, तुळशीराम सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे यांनी ही कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com