प्रांताधिकार्‍यांना शिवीगाळ करणारा 'तो' पोलीस कर्मचारी निलंबित

प्रांताधिकार्‍यांना शिवीगाळ करणारा 'तो' पोलीस कर्मचारी निलंबित

कर्जत l प्रतिनिधी

कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना अवैध वाळू वाहतूक कारवाईदरम्यान शिवीगाळ करणारा कर्जतचा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याला निलंबित करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता महसूल विभागाच्या पथकाकडून कर्जतच्या बालाजी मंदीर येथे कारवाई सुरू असताना त्याने शिवीगाळ करून वाळूचा ट्रक पळवून नेण्यास मदत केली होती.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस निरीक्षक यांनी त्याबाबतचा अहवाल दिला होता. त्या अहवालावर कार्यवाही करत व्हरकटे याला शुक्रवारी रात्रीच निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती दिली. व्हरकटे याच्याविरुद्ध कलम ३७९, १८६, ५०४, ३४ व भारतीय पर्यावरण कायदा ३, ५ अन्वये कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com