दोघांना गोळीबाराने जखमी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

दोघांना गोळीबाराने जखमी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

कर्जत l प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील निंबोडी या गावांमध्ये शेळी चोरून नेत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून एकास पकडले. त्यावेळी त्यांनी गोळीबार करून दोन ग्रामस्थांना जखमी केले होते.

या घटनेतील आरोपी अमर दत्तु पवार (वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर) यास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.

कर्जत तालुक्यातील निंबोडी या गावामध्ये (दि १०) रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटे आले होते. त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची इतर नातेवाईकही जागे झाले. त्यावेळी चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली. परंतु जमलेल्या सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि एका चोरट्याला पकडले त्यावेळी इतर दोन चोरटे पळून गेले. मात्र त्यानंतर दोघे चोरटे परत आले व त्यांनी पकडलेल्या साथीदाराला सोडा अन्यथा गोळ्या घालून असा दम दिला.

Title Name
दूध डेअरीवर राहुरी तहसीलदारांची दंडात्मक कारवाई
दोघांना गोळीबाराने जखमी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

परंतु खंडू गरड व भरत बर्डे यांनी त्या चोरट्यास पकडून ठेवले होते व सोडण्यास नकार दिला. यामुळे चोरट्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी खंडू गरड यांच्या कान आणि जबड्याला चाटून गेली तर भरत बर्डे याच्या पोटला घासून गेली. यानंतर जखमींना प्रथम कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणले आणि त्यानंतर नगर येथे हलविण्यात आले होते. या बाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत अण्णासहेब जाधव यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवुन सदर अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करुन मार्गदर्शन करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी उस्मानाबाद, सोलापुर, बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील १०० पेक्षा जास्त आरोपी चेक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व त्यांच्या टीमने केलेल्या तपासामध्ये हा गुन्हा हा अमर दत्तु पवार रा. अरणगाव ता. जामखेड, करण पंच्याहत्तर काळे रा. पाथरुड जि. उस्मानाबाद यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीच्या शोध घेतला असता नमुद आरोपी हे पोलीस पथकाला सतत हुलकावणी देत होते. २१ एप्रिल रोजी हे आरोपी पाथरुड, वडगाव नळी परिसरात फिरत असल्याचे कर्जत पोलीस पथकाला समजले. पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस अधिकारी सुरेश माने, अमरजीत मोरे यांच्या दोन्ही टीम दोन दिवस त्या परीसरात थांबवून तेथील भौगोलीक परीस्थीतीची माहिती घेतली.

Title Name
दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी केले जेरबंद
दोघांना गोळीबाराने जखमी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

२२ एप्रिल रोजी रात्री सापळा लावुन तेथील डोंगरावरून आरोपी अमर दत्तु पवार वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड यास शिताफीने ताब्यात घेतले. दुसरा आरोपी करण पंच्याहत्तर काळे रा. पाथरुड हा पळुन गेला आहे. ताब्यात घेतलेला आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करत आहेत. सदर अटक आरोपी विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

कर्जत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, महादेव कोहक, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमीत बर्डे, गणेश काळाने, रविंद्र वाघ, महीला अंमलदार कोमल गोफणे, सचिन राठोड मोबाईल सेल, किरण बोराडे, दादा टाके श्रीगोंदा पोस्टे जामखेड पोस्टेचे डि बी पथकातील पोलीस अंमलदार यांची मदत झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com