विशेष दंगल नियंत्रक पथकातील चार पोलिसांना करोनाची बाधा

कर्जतमध्ये दोन दिवस ग्रामदैवताच्या यात्रेला होता बंदोबस्त
विशेष दंगल नियंत्रक पथकातील चार पोलिसांना करोनाची बाधा

कर्जत|तालुका प्रतिनिधी|Karjat

कर्जत तालुक्यात आठ दिवस बंदोबस्तात असलेल्या विशेष दंगल नियंत्रक पथकातील चार पोलीस जवानांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पथकातील 22 जणांना नगर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्जत येथील पोलीस विभागाचे नोडल अधिकारी सुरेश माने यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील कर्जत, राशीन, जामखेड, श्रीगोंद्यासह परिसरामध्ये हे पोलीस मुख्यालयमधून दंगल नियंत्रण पथक करोनाच्या पार्श्वभूमीवर पाठविण्यात येत होते. शहरात 15 व 16 जुलै अशी दोन दिवस ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी आलेले होते.

यावेळी रस्त्यावर उतरून चोख बंदोबस्त ठेवला. याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांना नियंत्रित करण्यासाठी या सर्व जवानांनी काम केले. या मंदिर परिसरामध्ये यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह कर्जत शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते हे पोलीस अधिकारी ग्रामस्थ नागरिक विश्वस्त पुजारी आणि पत्रकार हे उपस्थित होते.

कर्जत येथे असतानाच काहींना त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांचे स्त्राव नगर येथे पाठविण्यात आले असता चार जण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस दलात व पोलीस अधिकार्‍यांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. चौघा जवांनाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचं महाकठीण काम आता आरोग्य विभागाला करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आम्हाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथे एका 45 वर्षे महिला करोना बाधित रुग्ण आढळून आली आहे. पहिलीची माहेर बारामती असून आईच्या निधनानंतर ती त्या ठिकाणी केली होती आणि जवळपास 10 दिवस त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते. त्यानंतर त्या परत गणेशवाडीला आल्या.

मात्र येथे आल्यावर त्यांच्या बारामती येथील भावास करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर या महिलेचा स्त्राव घेऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा अहवाल मंगळवारी 21 जुलै रोजी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये गणेशवाडी येथील ती महिला करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.

शहरामध्ये करोनाचे चार रुग्ण आढळून आले. शहरातील त्या भागातला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे. आ. रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी सील केलेल्या परिसरात स्वतः जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, रवींद्र सुपेकर, नामदेव थोरात, भास्कर भैलुमे, वैभव शाह आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com