दहशत माजविणारे दोघे जेरबंद

न्यायालयाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी
दहशत माजविणारे दोघे जेरबंद

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटेगाव येथे दहशत माजविणारे आरोपी अक्षय प्रभाकर डाडर व समाधान सर्जेराव डाडर, दोघे रा. पाटेगाव ता. कर्जत यांच्यातील अक्षय डाडर याचे पाटेगावमध्ये चिकनचे दुकान आहे. फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे यांनी पाटेगावमध्ये चिकनचे दुकान नव्याने सुरू केले. नवीन दुकान का टाकले असे म्हणुन चंद्रकांत प्रकाश साबळे व त्यांचे चुलते संदिप साबळे यांना त्रास देणे सुरू करून कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले.

ही माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, महादेव कोहक, संतोष फुंदे, शकील बेग यांना घटनास्थळी रवाना करून आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी सदर आरोपींना न्यायालयसमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी अक्षय डाडर व समाधान डाडर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली. यातील अक्षय डाडर याच्यावर यापूर्वीचा १ गुन्हा दाखल आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, महादेव कोहक, संतोष फुंदे, शकिल बेग यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, कोहक हे करत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांवर कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही. असा काही प्रकार असल्यास नागरिकांनी कर्जत पोलिसांशी संपर्क करावा.

चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com