कर्जत पंचायत समिती सभापतींच्या पतीवर हल्ला

बारा हल्लेखोरांवर गुन्हे दाखल
कर्जत पंचायत समिती सभापतींच्या पतीवर हल्ला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव यांचे पती दिलीप जाधव (रा. कोरेगाव, ता. कर्जत) यांना भर दिवसा अज्ञात टोळक्याने रस्त्यावर अडवून हल्ला केला. संशयित हल्लेखोरांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप जाधव शुक्रवारी (दि.29) सकाळी डोंबाळवाडी येथे पुलाचे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करून दुपारी सव्वाबरा वाजण्याच्या सुमारास ते कर्जत-करमाळा या रस्त्याने कोरेगावकडे परत येत होते. सिद्धिविनायक पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर पाठीमागून काळ्या रंगची स्कार्पिओ, कॉलीस व एक अशा तीन चारचाकी गाड्या आल्या. स्कार्पिओ गाडी ड्रायव्हरने जाधव यांच्या शेजारी उभी केली.

त्याच्या शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने कोरेगावकडे जाणारा रस्ता कुठून जातो अशी विचारणा केली. जाधव हे त्यांना रस्त्या सांगत असतांना गाडीच्या मधल्या सीटवर बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दरवाजा उघडून जाधव यांच्या दुचाकीला लाथ मारली. यामुळे ते खाली पडले असता तात्काळ स्कार्पिओ मधून चार ते पाच जण आणि त्याच्या पाठीमागील असणार्‍या गाडी मधून पाच ते सहा जण असे सर्वजण धावत आले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान जाधव यांच्या गळ्यामधील दीड तोळ्यांची सोन्यांची चैन एकाने हिसकाली लगेच सर्वजण परत गाडीमध्ये पळत जाऊन बसले आणि करमाळ्याच्या दिशेने निघून गेले. दरम्यान मारहाण करणार्‍या पैकी एका व्यक्तीला जाधव यांनी ओळखले असून तात्या उर्फ विश्वजीत वाघमोडे (रा.कुरण, तालुका करमाळा) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. दिलीप जाधव यांच्या फिर्यादीनंतर वाघमोडे यांच्यासह इतर दहा ते बारा जणांवर भादवि कलम 143 147, 149, 323, 327 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.