कर्जतमध्ये आरक्षण सोडती दरम्यान इच्छुकांची गर्दी

कर्जतमध्ये आरक्षण सोडती दरम्यान इच्छुकांची गर्दी

कर्जत |शहर प्रतिनिधी| Karjat

आगामी पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर पंचायत समिती गण आरक्षण सोडत गुरूवारी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी इच्छुक उमेदवार व नागरिक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यात जिल्हा परिषद गटात कुळधरण गट सर्वसाधारण, मिरजगाव अनुसूचित जाती महिला, कोरेगाव अनुसूचित जाती, चापडगाव अनुसूचित जाती, राशीन ओबीसी महिला यांचा समावेश आहे. तर पंचायत समिती गणनिहाय आरक्षणात निमगाव गांगर्डा सर्वसाधारण महिला मिरजगाव सर्वसाधारण महिला, चापडगाव सर्वसाधारण, टाकळी खंडेश्वरी सर्वसाधारण महिला, कोरेगाव सर्वसाधारण, आळसुंदे ओबीसी महिला, कुळधरण अनुसूचित जाती महिला, बारडगाव सर्वसाधारण राशीन सर्वसाधारण, भांबोरा ओबीसी असे आरक्षण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com