कर्जतमध्ये नगरपंचायत आपल्या दारी

प्रभाग बारामधून उपक्रमास सुरवात
कर्जतमध्ये नगरपंचायत आपल्या दारी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहर हे आदर्श शहर बनवण्यासाठी कर्जतमध्ये ‘नगरपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नागरिकांना प्रभागात भेडसावत असलेल्या समस्या वेळेअभावी किंवा काही कारणामुळे नगरपंचायतपर्यंत पोहचवता येत नाहीत. त्या समस्या जाणून घेण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 12 मधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडल्या. राऊत व इतरांनी त्या जाणून घेतल्या. अनेक समस्या या तेथेच सोडवण्यात आल्या.

काही समस्या नगरपंचायतच्या माध्यमातून तर काही समस्या या आ. पवार यांच्या माध्यमातुन सोडविण्यात येणार आहेत. राऊत यांनी त्यांचा प्रभाग आदर्श होण्यासाठी माझे झाड माझे कुटुंब, आपला प्रभाग- सौर ऊर्जा युक्त प्रभाग तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सशक्त बनवणे अशा विविध विषयांवर येणार्‍या काळामध्ये काम केले जाणार आहे. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, विविध विभागाचे अधिकारी, गटनेते, उपगटनेते, सर्व समितीचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत विभाग प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम पूर्ण शहरामध्ये राबवायचा आहे. त्यातून कर्जत शहर हे आदर्श शहर होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. नगरपंचायत आपल्या दारी उपक्रमांतुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. अगामी काळाज कर्जत शहर एक स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न आहे.

- उषा अक्षय राऊत, नगराध्यक्षा

Related Stories

No stories found.